काटी : उमाजी गायकवाड

तुळजापूर तालुक्यातील काटी येथे शुक्रवार दि. (1) रोजी सकाळी नववर्षाचे औचित्य साधून येथील मुख्य बाजार चौकातील गुरव शॉपिंग कॉप्लेक्समध्ये अमरसिंह गाटे व प्रविण गाटे या पितापुत्रांनी सुरू केलेल्या कृष्णा दुध डेअरीचे उद्धघाटन प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सयाजी देशमुख व राजेंद्र गाटे यांच्या हस्ते करण्यात आले.      

यावेळी  येथील दूध उत्पादक व पशुपालक शेतकरी उपस्थित होते. या दुध डेअरी मध्ये दुध  संकलन केले जाणार असून दूध उत्पादक व पशुपालकांना माफक व योग्य भाव देऊन दूध खरेदी केले जाणार आहे. तसेच या दुध डेअरीत खवा, दही, ताक, लोणी, श्रीखंड, पणीर आदी दुग्धजन्य पदार्थ माफक दरात मिळणार आहे.

या उदघाटन सोहळ्याप्रसंगी प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सयाजी देशमुख, सुभाष साळुंके, अमरसिंह गाटे, प्रविण गाटे, राजेंद्र गाटे, प्रकाश गाटे, भागवत गुंड,  पत्रकार उमाजी गायकवाड, माजी सैनिक श्रीकांत गाटे, चंद्रकांत काटे, सचिन इंगळे, अर्जुन बामणकर, मोहन शिंदे, दादा गाटे, सुरज गाटे, अतुल सुतार, सुदर्शन गाटे, महेश गाटे, आण्णा गाटे, गोपाळ चिवरे, समर्थ रोडे, आनंद गाटे, आकाश सुळे, निखिल गुंड आदी मान्यवर उपस्थित होते.

 
Top