नळदुर्ग, दि. १ : नगरपालिका नळदुर्ग तर्फे माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत शहरामध्ये आपल्या वसुंधरेची जपवणुक व्हावी पृथ्वी तलावरील निसर्गनिर्मित गोष्टींचा अपव्यय होणार नाही झाडे लावू पर्यावरण पूरक वातावरण निर्माण होईल असे काम करू शहर हरित व स्वच्छ ठेवू या संदर्भात पालिकेसमोर हरित शपथ घेण्यात आली.
यासाठी मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड , नगरसेवक उदय जगदाळे तसेच सुरज गायकवाड सहाय्यक प्रकल्पअधिकारी, फरमान पठाण, स्वच्छता निरीक्षक खलील शेख, रातनदीप माने, समीर मोकाशी, मुस्तक पटेल, रानुबाई सपकाळ, तानाजी गायकवाड नवनाथ होणराव, सुशांत भालेराव, नितीन पवार शहाजी येडगे आदी कर्मचारी आणि महिला बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.