अचलेर : जय गायकवाड
अचलेर प्रीमियर लीग यांच्या वतीने अचलेर येथे आयोजित करण्यात आलेल्या अचलेर प्रीमियर लीग २०२० च्या चषकाचे विजेतेपद गाझी क्रिकेट संघ नळदुर्ग यांनी पटकाविले आहे.तर मंकाळेश्र्वर क्रिकेट संघ दस्तापुर यांना उपविजेतेपद पदावर समाधान मानावे लागले.विजेत्या व उपविजेत्या संघास सामना संपताच उपस्थितांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.
शुक्रवारी १ जानेवारी २०२१ रोजी दुपारी झालेल्या या अंतिम सामन्यात गाझी क्रिकेट संघाने मंकाळेश्र्वर क्रिकेट संघावर विजय मिळवत अचलेर प्रीमियर लीग २०२० चा चषक पटकावला.
मंकाळेश्र्वर क्रिकेट संघास उपविजेता म्हणून पारितोषिक देण्यात आले.अंतिम सामन्यात गाझी क्रिकेट संघाच्या समीर शेख याने सामनावीरचा किताब पटकावला.
गाझी क्रिकेट संघ नळदुर्ग यांना प्रथम क्रमांकाचे रोख २१००० हजार रुपये व चषक,मंकाळेश्र्वर क्रिकेट संघ दस्तापुर उपविजेता ठरल्याने रोख ११००० हजार रुपये व चषक,तर जय सेवालाल क्रिकेट संघ अचलेर या संघास तृतीय पारितोषिक रोख ७००० हजार रुपये व चषक देण्यात आला.
स्पर्धेतील वैयक्तिक बक्षिसे ही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते याचवेळी देण्यात आले.
या मालिकेतील अष्टपैलू खेळाडू म्हणून रॉयल क्रिकेट संघ मुरुमचा खेळाडू मुन्ना यास तर नळदुर्ग क्रिकेट संघाचा कर्णधार सूफियान यास मालिकावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी श्री.श्री.श्री.बसवराजेंद्र महास्वामीजी,डी.आर.माने सर, आकाश सुरवसे,पप्पू रुपणुर, दिपक माने,शेखर कांबळे (पत्रकार) मनिषा गायकवाड (पत्रकार)नळदुर्ग येथील अझर सावकार यांच्यासह सर्व क्रिकेट प्रेमी उपस्थित होते.अंतिम सामन्याचे पंच म्हणून संतोष लोखंडे व आमोल डावरे तर तिसरे पंच न्यूसन कांबळे यांनी चोख कामगिरी बजावली.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी धम्मदिप क्रिकेट संघाच्या सर्व खेळाडूंनी व धम्मदिप तरुण मंडळाच्या सर्व तरुणांनी परिश्रम घेतले.अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात या लीगची सांगता करण्यात आली..