काटी : उमाजी गायकवाड
स्त्रियांसाठी साक्षरतेची वाट प्रकाशमान करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती तुळजापूर तालुक्यातील कुंभारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत रविवार दि. (3) रोजी सकाळी नऊ वाजता उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी शाळेतील सहशिक्षिका सौ. वासंती गायकवाड यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून प्रतिमेचे पूजन करून सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले. सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून शाळेतील विद्यार्थ्यांनींनी शाळेसमोरील परिसराची स्वच्छता केली.
यावेळी सहशिक्षिका सौ. वासंती गायकवाड, अंगणवाडी सेविका सौ. इंगळे यांच्यासह कु. नंदिनी लोहार, कु. अनन्या लोहार, कु. श्रध्दा धनके, कु. शिवानी वडणे, चि. हर्षद दिलपाक, चि. शुभम शिंदे, अर्थव लोहार, चि. संकेत वडणे, चि. स्वप्निल पारधे हे विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होते.