काटी : उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथे रविवार दि. (3) रोजी येथील माळी गल्लीतील महात्मा फुले चौकातील सावित्रीच्या लेकिंनी भारत देशातील स्त्रीच्या जीवनाला ज्ञानमृताचा आनंद देणाऱ्या, शिक्षणाची ज्ञानगंगा प्रत्येकाच्या घरात पोहचविण्यासाठी पहिल्या महिला शिक्षिका म्हणून अजरामर असणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रारंभी माजी पंचायत समिती सदस्या सौ.अनुसया ढगे, कांचन ढगे आणि सौ. सुवर्णा हेडे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी पंचायत समिती सदस्या सौ. अनुसया ढगे, सौ.सुवर्णा हेडे, सौ.कांचन ढगे, सारिका बनसोडे, हर्षदा हागरे, दिव्या ढगे, सानिका भाले, राधा भाले,नूतन ढगे,आशा भाले, आशा ढगे,ग्रा.पं. सदस्य तथा सावता परिषदेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भाले,बबन ढगे,सचिन भोजने, बबन हेडे, बळी चवळे, दादा चवळे,अनिल ढगे,अरविंद ढगे,प्रताप ढगे,जयदीप भोजने, नवनाथ सुरडकर,विशाल साळुंखे, मोहन हागरे, हर्षवर्धन ढगे,अमोल वेदपाठक,बबन शिंदे, सुमित ढगे,उत्तम हागरे,शरद ढगे, बाळु सुतार आदी मान्यवर उपस्थित होते.