उस्मानाबाद,दि.24 : सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे बांधण्यात आलेल्या उमरगा येथील शासकीय विश्रामगृहाचे उद्या दि.25 जानेवारी 2021 रोजी दुपारी 3.30 वाजता पालकमंत्री तथा मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे असतील तर प्रमख पाहुणे म्हणून राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) अशोकराव चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यमंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) दत्तात्र्य भरणे उपस्थित राहणार आहेत.
यावेळी जि.प.च्या अध्यक्षा अस्मिताताई कांबळे,आमदार सर्वश्री सतीश चव्हाण,विक्रम काळे,सुजितसिंह ठाकूर, सुरेश धस, ज्ञानराज चौगुले,कैलास पाटील, राणाजगजितसिंह पाटील,प्रा. डॉ.तानाजी सावंत, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर आदींची प्रमुख उपस्थितीती राहणार आहे.
या समारंभास उपस्थित राहण्याची विनंती अधीक्षक अभियंता अ.दि. कुलकर्णी, कार्यकारी अभियंता अ.ज्ञा.सगर यांनी केली आहे.