उस्मानाबाद, दि.24 : 
मराठवाडा पदवीधर मतदार संघातून आमदार सतीश चव्हाण हे तिसऱ्यांदा निवडून आल्याबद्दल त्यांचा उस्मानाबादेत सत्कार करण्यात आले.


 उस्मानाबाद येथे रविवारी आमदार सतीश चव्हाण यानी कार्यकर्त्यांची भेटी घेवुन संवाद साधून आभार मानले. 

उसमानाबाद येथील शासकीय विश्रामगृहात रविवार दि. 24 जानेवारी रोजी जिल्ह्यातील काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस ,  शिवसेना पक्षासह विविध शिक्षक संघटना, संस्था चालकाच्यावतीने  शाल, बुके, पुष्पहार घालून पेढा भरवून आमदार‍ सतिश चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार चव्हाण यानी कार्यकर्त्यांच्या समस्‌या जाणून घेतल्या.  पदवीधरांचे प्रश्न सभागृहात मांडून त्यांना न्याय देण्याचे आश्वासन देवुन प्रथम पसंतीने निवडून दिल्याबद्दल सर्वांचे त्यांनी आभार मानले.
 
Top