नळदुर्ग : महामार्गावरील आलियाबाद घाटात कंटेनर उलटुन झालेल्या आपघातात तीन म्हशी जागीच ठार झाल्याची घटना रविवार दि.२४ जानेवारी रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडला. दरम्यान आपघातानंतर सोलापूर - हैद्राबाद महामार्गाच्या दुर्ताफा वाहनाच्या मोठया रांगा लागल्याचे दिसुन आले.
रविवारी नळदुर्ग येथिल पशुपालक मच्छिद्र लक्ष्मण जाधव याच्या मालकीच्या म्हशी चरण्यासाठी आलियाबाद शिवारात गेल्या होत्या. दुपारी आलियाबाद घाटातील हनुमान मंदीरासमोर आचानक भरधाव कंटेनर ( क्र.एम .एच ४६ /ए. के,३२३० ) उलटला. यावेळी टँकरच्या खाली तीन म्हशी चिरडुन ठार झाल्याचे घटना स्थळावरुन प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.
दरम्यान या घटनेमुळे मच्छिद्र जाधव यांचे खुप मोठे नुकसान झाले आहे. म्हशीवरच त्यांचे उदरनिर्वाह होते. ही घटना समजताच नळदुर्ग पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक जगदीश राऊत ,महामार्ग पोलिस केंद्राचे प्रभारी आधिकारी हनुमंत कवले यांच्यासह पोलिस कर्मचारी यानी धाव घेवुनआपघातग्रस्त कंटेनर बाजुला काढण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. पोलिसानी वाहतुक सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत होते. माञ उशिरापर्यंत वाहतुकीची कोंडी झाल्याचे दिसुन आले. महामार्गावरील मालवातुक व एस.टी.बस हे मैलारपुर ,मुर्टा मार्गे वळविण्यात आली.