नळदुर्ग, दि.28: दरवर्षी पौष पोर्णिमेनिमित्त लाखोंच्या संख्येनी भरणारी नळदुर्ग येथील श्री क्षेत्र मैलारपूर खंडोबा यात्रा ही यावर्षी कोरोनामुळे रदद करण्यात आली आहे. त्याचबरोबर मंदिर परिसरात संचारबदी लागु करण्यात आली आहे. त्यामुळे दि.28 जानेवारी रोजी सकाळ पासुनच खंडोबा मंदिर परिसर भाविकाविना सर्वत्र शुकशुकाट असल्याचे दिसुन आले.
मैलारपूर नळदुर्ग येथील मल्हारी मार्तंड श्री. खंडोबा मंदिरा पासून जवळपास एक ते दिड कि.मी.अंतरापर्यंत संपुर्ण परिसरात यळकोट , यळकोट!! जय मल्हार!!!चा गजर करत मानाच्या काट्या घेऊन वाजतगाजत जानेवारी महिन्यातील पौष पोर्णिमेला दरवर्षी राज्यतील व शेजारील राज्य कर्नाटकातून लाखोंच्या संख्येने भाविकांची गर्दी होते. परंतु यावर्षी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन निर्णयाची अमलबजावणी यात्रा न भरविण्याचा निर्णय घेतल्याने पौष पोर्णिमेला यात्रा भरलीच नाही.
![]() |
गतवर्षीचा संग्रहीत फोटो |
मंदिर परिसरात व्यावसायिकानी दुकान थाटले नाही. मंदिराकडे जाणारे सर्व रस्ते पोलीस प्रशासनाने बंद केले. याशिवाय मंदिर कमिटीचे व्यवस्थापक अरूण मोकाशे यानी मंदिर स्पिकरवरून भाविकांना विनंती वजा आवहान करत होते की, मंदिरापासून दोन कि.मी.अंतरावर संचारबंदी लागू केलेली आहे. त्यामुळे भाविक फिरकले नाही, कांही भक्त लांबुनच डोंगरावरून श्रीफळ वाढुन दर्श घेताना दिसत होते.
यात्रेच्या इतिहासात पहिल्यांदाच यत्रा बंद करण्याची वेळ आल्याने भाविक भक्तांना आपल्या कुलदैवताचे दुरून दर्शन करावे लागले. दरम्यान काही भक्त कुंटूबियासह वाहनाद्वारे आले असता मैलारपूरकडे जाणारे सर्व रस्ते सिल असल्याने नाइलाजाने त्यांना परत फिरावे लागले. नगरपालिकेचे मुख्यधिकारी लक्ष्मण राठोड. मंदिर समितीचे चेअरमन प्रकाश मोकाशे , व्यवस्थापक आरूण मोकाशे , साहय्यक पोलिस निरिक्षक जगदीश राऊत, सुधीर मोटे, महामार्ग पोलिस केंद्राचे प्रभारी आधिकारी हणुमंत कवले , वैदयकिय आधिकारी डॉ. राहुल जानराव, यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी यानी कडेकोट बंदोबस्त ठेवले आहे.