चिवरी : राजगुरू साखरे
तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत कार्यालय कडून कोरोणाच्या काळामध्ये आपल्या जिवाची पर्वा न करता अविरत सेवा देणाऱ्या गावातील पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या, ग्रामपंचायत कर्मचारी, तलाठी ,जि.प.शाळेचे शिक्षक, यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सरपंच अशोक घोडके, उपसरपंच बालाजी पाटील, पोलीस पाटील रुपेश बिराजदार, माजी सैनिक विठ्ठल होगाडे, सामाजिक कार्यकर्ते राजीव कचवाई, सचिन बिराजदार, विकास सोसायटीचे चेअरमन बालाजी शिंदे, कैलास शिंदे , राम झांबरे,शाहीर बंटी देडे, भारतीय जवान अंकुश कोरे, तलाठि डी एन गायकवाड, मुख्याध्यापक मेत्रे सर , ग्रामपंचायत लिपिक अनिल देडे,अंगणवाडी सेविका अनिता बिराजदार,उषा नगदे, शिंदे मेंढापूरे, चिमणे, आशा कार्यकर्त्या अर्चना राजमाने, राजश्री कांबळे, आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कमलाकर सूर्यवंशी तर आभार प्रदर्शन विठ्ठल होगाडे यांनी केले.