तुळजापूर, दि. ६ :

परंडा तालुक्यातील वाकडी येथील निलेश सुनिल वळेकर या विद्यार्थ्याच्या मेडिकल कॉलेज प्रवेशासाठी मुलाच्या वाढदिवसाची रक्कम सस्नेह भेट देण्याचा उपक्रम वाकडी ता.परांडा  येथील पाटील परिवारांना राबवला आहे. 

शिवसेना नेते धनंजय पाटील यांचे चिरंजीव  सुर्जन धनंजय पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वाढदिवस साजरा न करता अकरा हजार रुपये रक्कम परंडा तालुक्यातील वाकडी येथील गुणवंत विद्यार्थी निलेश सुनिल वळेकर याच्या मेडिकल प्रवेशाला मदत म्हणून सस्नेह भेट दिली आहे, मातोश्री सौ दक्षायणी  पाटील यांच्या हस्ते ही रक्कम सदर विद्यार्थ्यास प्रदान करण्यात आली याप्रसंगी वडील उत्तमराव पाटील, सोहम सावंत , बंधू तानाजी पाटील, पत्नी संगीता पाटील, मुलगा सुर्जन पाटील व वळेकर परिवारातील  याप्रसंगी उपस्थिती होती.

यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकिय वैद्यकीय महाविद्यालयात निलेश वळेकर वैद्यकीय शिक्षण घेणार असून वाकडी सारख्या ग्रामीण भागातून नीट परीक्षेत त्याने ५८० गुण मिळवून आपल्या गुणवत्तेची साक्ष दिली परिस्थिती अडचणीची असल्यामुळे त्याच्या आई-वडिलांना हा खर्च अडचणीचा होऊ नये यासाठी पाटील कुटुंबियांच्या वतीने ही छोटीशी मदत केल्याची प्रतिक्रिया या निमित्ताने शिवसेना नेते धनंजय पाटील यांनी व्यक्त केली. वाढदिवसाचा कौटुंबिक कार्यक्रम देखील अत्यंत छोटेखानी साजरा करून वाकडी येथील तरुणांसाठी सुर्जन पाटील यांनी चांगले उदाहरण पुढे केले आहे,  यामध्ये त्याने दाखवलेली सामाजिक भान वाकडी करांना भावले आहे.

 
Top