नळदुर्ग दि. 6 : लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेला ग्रामीण भागातील पत्रकार कशाचीही पर्वा न करता विशेष परिश्रम करुन समाजप्रबोधनाचे कार्य नेटाने करीत आहे. ग्रामीण पत्रकारासमोर‍ विविध अडचणी असतानाही त्यावर मात करुन सामाजिक जाणिवेतून शिक्षकासारखे अखंडपणे कार्य करीत असल्याचे गौरवोद्गार नळदुर्गच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय कोरेकर यांनी काढले. 

दर्पण दिन, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या 209 व्या जयंतीचे औचित्य साधून बुधवार दि. 6 जानेवारी रोजी नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संजय कोरेकर, तर प्रमुख अतिथी म्हणुन उपप्राचार्य डॉ. रामदास ढोकळे, नळदुर्ग शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे, जय महार पत्रकार संघाचे श्रीकांत अणदुरकर हे व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवराच्या हस्ते करण्यात आले. 

या कार्यक्रमात पत्रकार सुहास येडगे, श्रीकांत अणदुरकर, विलास येडगे, तानाजी जाधव, तुळजापूर लाईव्हचे संपादक शिवाजी नाईक, भगवंत सुरवसे, दादासाहेब बनसोडे, इरफान काझी, श्रीनिवास भोसले, लतीफ शेख, उत्तम बनजगोळे, लक्ष्मण दुपारगुडे, दयानंद काळुंके, जहिर इनामदार, सचिन गायकवाड, पांडुरंग पोळे, दिपक जगदाळे, शिवशंकर तिरगुळे, सचिन तोग्गी, आयुब शेख आदीसह अणदुर व नळदुर्ग येथील सर्व पत्रकारांना महाविद्यालयाच्या वतिने मायेची शाल पांघरुन पुष्प गुच्छ देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्र संचलन डॉ. संतोष पवार तर आभार डॉ. रोहिनी महिंद्रकर यांनी मानले.

राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा. एन.जी. शेरे, प्रा.डॉ. रोहिनी महिंद्रकर, प्रा. एम.सी. झाडे, प्रा. एस.व्ही. सावंत, प्रा. पी.एस. अमृतराव, प्रा.डॉ. समीर पाटील, प्रा. यु.एन. भाळे प्रा. टी.एल. दबडे, सिद्राम सुतार यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकत्त्तेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यर्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरेश गायकवाड, माणिक राठोड, लिंबराज बेले, उमेश सर्जे, सिद्राम सुतार, भागीनाथ बनसोड आदीनी पुढाकार घेतला.

 
Top