नळदुर्ग, दि. 06 : शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी तुळजापुर तालुक्यातील होर्टी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच यांच्यासह दोन ग्रा.पं. सदस्यांना अपात्र ठरवत त्यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगाकर यांनी दिले आहे. या घटनेने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शिवसेनेचे माजी सरपंच ज्ञानेश्वर भोसले यांनी तक्रारी अर्ज दिला होता. 

जिल्हाधिका-यानी दिलेल्या निकालपत्रात म्हटले आहे की, होर्टी ता. तुळजापूर येथील उपसरपंच अशोक राजमाने, सदस्य बेबाबाई मसाजी कांबळे, विलास गायकवाड यांच्या विरोधात सरकारी महाराष्ट्र ग्रामपंचायती अधिनियम 1958 चे कलम 14 (ज-3) मधील तरतुदीनुसार शासकीय जागेवर अतिक्रमण केले म्हणून ग्रामपंचायत सदस्यपद रद्द करण्यासाठी माजी सरपंच ज्ञानेश्वर भोसले यांनी उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. 

त्यावरुन अशोक राजमाने, बेबाबाई कांबळे, विलास गायकवाड यांना अतिक्रमण संदर्भात नोटीस देण्यात आली. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 53 नुसार नोटीस मान्य नसल्यास सक्षम प्राधिका-यांकडे आव्हानित करणे आवश्यक आहे. मात्र सदर नोटीस आव्हानित केले बाबतचा कोणताही पुरावा प्रकरणात सादर केलेला नाही. त्यानंतर स्थळ पंचनामा करण्यात आला. त्यामध्ये अशोक राजमाने हे गेली 20 वर्षे त्या ठिकाणी राहतात व कुठेही बांधकाम करतेवेळी बांधकाम परवाना न घेता बांधकाम केल्याचे निदर्शनास आले. तसेच गेली 20 वर्षे राजमाने यांनी कुठेही टॅक्स भरलेला नाही. त्यांच्या घरासमोर एमडीआर 37 हा रस्ता गेलेला असल्याने त्यांनी केलेल्या बांधकामामुळे गटारीचे पाणी थांबते व शौचालय बांधकाम रोडच्या साईटपट्टीवर केल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले. 

तसेच दुसरे ग्रामपंचायत सदस्य   विलास नरसप्पा गायकवाड हे अनुसुचित जाती प्रवर्गातिल आसुन त्यांनी  घर नं 530चे बांधकाम हे बेकायदेशिर केले आहे त्यांच्या मिळकती पेक्षाजास्त बांधकाम केले आसुन ते करीत असताना भिमनगर ते ग्रामपंचायत चा सरकारी रस्ता रोखला आहे. तिसरे सदस्य बेबीनंदा मसाजी कांबळेया अनुसुचित जाती महीला प्रवर्गातुन निवडून आल्या आसुन त्यांचे घर नं112हे अंगणवाडीशी संबधीत आहे त्यांनी  घराचे बांधकाम करताना पुर्व पश्चिम 9फुट व उत्तर दक्षिण 13फुटबांधकाम हे वाढवुन अतिक्रमण केले आहे. या तिनही अतिक्रमण धारकांचा होर्टी ग्रामपंचायतीने जातमुचलक्यावर जावुन पंचनामा करुन सदर अतिक्रमण त्वरीत काढुण टाकण्या बाबत नोटीसाही दिल्या होत्या. 

उपरोक्त पंचनामावरुन महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियिम 1958 चे कलम मधील तरतुदीसार वरील सदस्यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याचे सिध्द होत आहे. त्यावरुन दि. 31 डिसेंबर 2020 रोजी  जिल्हाधिकारी यांनी होर्टी ग्रा.पं. चे उपसरपंचासह दोघा सदस्यांना महाराष्ट्र ग्रामपंचायती अधिनियम  1958 मधील तरतुदीनुसार अपात्र ठरवत त्यांचे सदस्यपद रद्द ठरविण्याचे आदेश दिले आहे.

 
Top