उमरगा : येथील रोटरी क्लब उमरगा आणि उपजिल्हा रुग्णालय उमरगा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय बालिका दिनाच्या निमित्ताने आयोजित उपक्रमाची सुरुवात स्त्री जन्माच्या स्वागताने क्लबच्या अध्यक्षा कविता अस्वले यांनी केले.

भारत सरकारच्या निती आयोग अंतर्गत उस्मानाबाद जिल्हा हा बेटी बचाव बेटी पढाव या कार्यक्रमांतर्गत असल्यामुळे आणि भविष्यात जिल्ह्यात लिंग गुणोत्तर प्रमाण कमी होत गेल्यास समाजामध्ये लिंगगुणोत्तर चा असमतोल निर्माण होण्याची शक्यता आहे .म्हणून या कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त उपजिल्हा रुग्णालय आणि रोटरी क्लब उमरगा यांच्यावतीने 24 ते 26 जानेवारी 2019 पर्यंत मुलींच्या जन्माचे स्वागत करणे आरोग्य विषयक कार्यक्रमाचे आयोजन करणे,   शाळा महाविद्यालयातील  मुलींसाठी  आरोग्यविषयक प्रबोधनात्मक कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत, असे प्रतिपादन या प्रोजेक्ट चे चेअरमन रोटे डॉक्टर विक्रम आळंगेकर यांनी प्रास्ताविकात म्हटले.

 या उपक्रमाची सुरुवात या स्त्री  जन्माचे  स्वागत करून झाली.  यावेळी रोटरी क्लबच्या अध्यक्षा रोटे  कविता अस्वले रोटरीच्या सदस्या रोटे  शुभांगी स्वामी,  रोटे सविता दळवी,   मेहजाबीन मुल्ला यांनी उपजिल्हा रुग्णालयात नुकत्याच जन्मलेल्या बालकांना ड्रेस तसेच त्यांच्या आईला साडी चोळी दिली. या कार्यक्रमासाठी रोटरी तसेच उपजिल्हा रुग्णालय यानी पुढाकार घेतला आहे.

 
Top