हन्नुर : नागराज गाढवे
सोलापूर येथील श्री बृहन्मठ होटगी संचालित श्री वीर तपस्वी मराठी प्राथमिक शाळा भवानी पेठ सोलापूर येथे राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
शाळेचे वत्तीने मतदार दिनानिमित्त ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे प्रत्येक विद्यार्थी आपल्या घरात रांगोळी काढून ऑनलाईन स्पर्धेत सहभाग घेतले होते.यामध्ये अनेक विद्यार्थी रांगोळीच्या माध्यमातून अनेक विषयावर प्रबोधन केले.
या स्पर्धेत इ. 4 तील विद्यार्थिनी कू. सृष्टी श्रीकांत धनशेट्टी हिने सुबक रांगोळीच्या माध्यमातून नवा मतदारांना मतदान साठी नाव नोंदणी करण्यासाठी प्रबोधन केले. असा अनेक वेगवेगळ्या विषयावर विद्यार्थ्यांनी रांगोळीच्या माध्यमातून प्रबोधन केले ..विद्यार्थ्यांच्या या रांगोळीच्या केलेल्या उपक्रमाबद्दल वर्गशिक्षक आणि शिक्षिका आणि व मुख्याध्यापक यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.