उस्मानाबाद दि.17 : येथील कौटुंबिक न्यायालयात मराठी भाषा पंधरवडा दिन दि.१६ जानेवारी रोजी साजरा करण्यात आला. यावेळी या सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  या कार्यक्रमास कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश ए.ए.शिंदे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एस बी तोडकर, साहित्यिक व चित्रकार राजेंद्र अत्रे यांच्यासह कौटुंबिक न्यायालयातील कर्मचारी विधिज्ञ व पक्षकार उपस्थित होते.

 उस्मानाबाद येथील न्यायालयीन काम मराठीतून करण्यावर भर दिला जाईल असे  न्यायाधीश ए .ए . शिंदे असे त्यांनी सांगितले. तर राजेंद्र अत्रे म्हणाले की, मराठी ही माणसाच्या अत्यंत जवळची भाषा असल्यामुळे न्यायालयीन कामकाज व प्रशासकीय कामकाज जर मराठीतून झाले तर लोकांना ते अत्यंत सोयीचे होईल. केवळ इंग्रजी न बोलता आल्यामुळे किंवा इंग्रजी न समजल्यामुळे अनेक अडचणी निर्माण होतात. परंतू इतर कोणत्याही भाषेचा द्वेष न करता राजभाषा म्हणून मराठीचा वापर करणे ही काळाची गरज झाली असल्याचे त्यांनी सांगितले. तर यशस्वी तोडकर यांनी  न्यायालयीन कामकाजामध्ये मराठी भाषेचा वापर याबाबत असणारे शासनाचे निर्णय  राज्य भाषा अधिनियम १९६४ मध्ये करण्यात आलेल्या तरतुदी याची माहिती दिली आहेत.  विशेष म्हणजे मराठी ही आपली मायबोली असून तिचे जतन करणे हे आपले कर्तव्यच आहे .  न्यायालयात रोजनामा  लिहिताना , साक्षी नोंदविताना ,  आदेश व न्यायालयीन  निर्णय पारित करते वेळी मराठी भाषेचा वापर केल्यास पक्षकारांना प्रकरणांची कारवाई समजण्यास आवश्यक मदत होईल . त्यादृष्टीने पावले उचलण्याची आणि   योग्य निर्णय घेण्याची गरज आहे . दरम्यान , मराठी भाषा पंधरवडा दिनानिमित्त दि.१४ ते २७ जानेवारी या दरम्यान कौटोबिक न्यायालयात  विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत अशी  माहितीही यावेळी देण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून  विधिज्ञ ॲम्बी माडेकर यांनी आभार मानले.

 
Top