![]() |
राजकुमार चाकवते |
उस्मानाबाद : येथील माजी नगरसेवक राजकुमार महावीर चाकवते यांचे गुरूवारी (दि. ७ जानेवारी) दुपारी तीनच्या सुमारास सोलापूर येथे खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना निधन झाले. मृत्यूच्या वेळी त्यांचे वय ६१ होते. त्यांच्या पश्चात वडील, तीन बंधू, पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. उस्मानाबाद नगरपालिकेचे नगरसेवक म्हणून त्यांनी यशस्वीपणे काम केले. गेल्या काही दिवसांपासून ते अाजारी होते. त्यांचा सोलापूरच्या खासगी रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर कपिलधार स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सकल जैन समाजाचे अध्यक्ष उल्हास चाकवते यांचे ते बंधू तर कपड्याचे व्यापारी चेतन चाकवते, अनिकेत चाकवते यांचे ते वडील होत.