अचलेर : जय गायकवाड

लोहारा तालुक्यातील अचलेर येथे भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ठिकठिकाणी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.

ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच श्री.प्रकाश लोखंडे,विद्या विकास हायस्कूल येथे मुख्याध्यापक श्री. भास्कर बेंडगे,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (मुलांची)येथे मुख्याध्यापक श्री.कृष्णा खंडागळे,जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळा येथे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. संदिप पाटील,जिल्हा परिषद स्पेशल प्राथमिक शाळा येथे मुख्याध्यापक श्री.रामचंद्र गिरी, बाजार चौक येथे श्री.दयानंद कमळापुरे,विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी येथे चेअरमन श्री.कल्लप्पा गोपने,तर हुतात्मा शंकरराव जाधव यांच्या समाधी स्थळी चे ध्वजारोहण श्रीमती.मथुराबाई अण्णाराव जाधव यांच्या हस्ते संपन्न झाले.

 
Top