तुळजापूर दि २६ :
वत्सला एच.पी गँस एजन्सी नळदुर्ग ता.तुळजापूर यांची (दि.२६)जानेवारी रोजी तुळजापूर शहरातील ग्राहक सेवा केंद्र सी एस सी तुळजापूर - जाधव काँप्म्लेक्स जे.बी.काँम्प्यूटर, क्रांती चौक मंगळवार पेठ,तुळजापूर येथे महंत मावजीनाथ यांचे हस्ते व पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जनराव साळुके, नगरसेवक पंडीत जगदाळे,नगरसेवक औदूंबर कदम, नगरसेवक किशोर साठे, नगरसेवक विजय कंदले,माजी नगरसेवक अमर हंगरगेकर यांचे उपस्थीतीत उद्घाटन झाले.
यावेळी अभीजीत पोळे, संभाजी पलंगे,नाना धोंडे,रोटरीच्या अध्यक्षा अँड.स्वातीताई नळेगावकर,अष्टभुजा महिला बचत गटाच्या प्रमुख मिनाताई सोमाजी,ग्राहक व पत्रकार बांधव आदी उपस्थीत होते.याप्रसंगी एच.पी गँसचे प्रथम ग्राहक प्रसाद प्रभाकरराव पाटील यांचा एजन्सीचे पांडूरंग पोळे व संजय जाधव यांचे हस्ते सत्कार करुन गँस जोडणीचे साहित्य वितरीत करण्यात आले.