काटी : उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील ग्रामपंचायत कार्यालय व विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी, मराठा समाज सेवा मंडळ सोलापूर, संचलित येडेश्वरी कन्या प्रशाला व जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक प्रशालेत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहणापुर्वी संविधानाचे प्रशालेतील सर्व विद्यार्थी, विद्यार्थीनी,उपस्थित ग्रामस्थ यांचेकडून सामुहिक वाचन करण्यात आले.
सालाबादप्रमाणे सलग तिसऱ्या वर्षी सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून येथील माजी सैनिक तथा सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत सौदागर गाटे यांच्या वतीने येडेश्वरी कन्या प्रशाला व जिल्हा परिषद प्रशालेतील विद्यार्थी,विद्यार्थींना खाऊचे वाटप करण्यात आले. तसेच येथील ग्रामपंचायत कार्यालय व विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीस छत्रपती शिवाजी महाराज यांचा छोटा पुर्णाकृती पुतळा सरपंच आदेश कोळी व चेअरमन विक्रमसिंह देशमुख यांचेकडे सुपुर्द करण्यात आला.
माजी सैनिक श्रीकांत गाटे यांच्या या उपक्रमाबद्दल ग्रामस्थांमधून कौतुक केले जात आहे.
यावेळी माजी सैनिक कल्याणकारी संस्थेचे माजी सैनिक श्रीकांत गाटे,माजी सैनिक जग्गनाथ खपाले, इजदानी बेग, विलास गाटे,सोसायटीचे चेअरमन तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख, सरपंच आदेश कोळी, व्हाईस चेअरमन भागवत गुंड, सेक्रेटरी संजय साळुंके,माजी चेअरमन सयाजीराव देशमुख,तन्वीर काझी, पत्रकार उमाजी गायकवाड,मकरंद देशमुख, सुजित हंगरगेकर,अतुल सराफ, जितेंद्र गुंड,सुहास साळुंके, बाळासाहेब भाले,दादा बेग, प्रा.भारत गुरव, प्रविण गाटे, वैभव गुंड, विकास खरात, दिनेश सुतार, समर्थ रोडे, सुरज गाटे, सोपान गाटे, तुकाराम गाटे, ज्ञानेश्वर गुरव, रावसाहेब गुंड, काका रोडे आदी मान्यवर उपस्थित होते.