हन्नुर : नागराज गाढवे
सोलापूर येथील श्री गणपती शिक्षण प्रसारक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वातंत्र्यसैनिक बाजीरावाने ढमाळ यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिक्षण संस्थेच्या वतीने मंगलदृष्टी भवन येथील वृध्दाश्रमातील गरजूंना किराणा वस्तू आणि भाजीपाल्याची वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना श्री गणपती शिक्षण प्रसारक संस्थेच्या सचिव उज्वला ढमाळ यांनी बाजीराव ढमाळ यांची स्मृती जपण्यासाठी आणि सामाजिक बांधिलकी म्हणून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आल्याचे सांगितले. यावेळी वृध्दाश्रमाच्या सेविका रजनी भाटिया, सुरज ढमाळ, समर्थ ढमाळ, उत्कर्षा ढमाळ, अश्विनी गोरे आदी उपस्थित होते.रजनी भाटिया यांनी आभार मानले.