तालुक्यातील वडगाव येथील विद्युत उपकेंद्र येथे कार्यरत कर्मचार्याचा कर्तव्यावर असताना अपघाती मृत्यू झाला होता. त्याच्या कुटूंबियास विमा कंपनीकडून 7 लाखा धनादेश सुपूर्त करण्यात आला आहे.
तालुक्यातील वडगाव येथील 33 के.व्ही. उपकेंद्र येथे वडगाव येथीलच बबन किसन पांढरे हे विद्युत कर्मचारी म्हणून कार्यरत होते. पांढरे यांचे कर्तव्यावर असताना अपघाती निधन झाले होते. पांढरे हे उस्मानाबाद येथील महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी बोर्ड स्टाफ को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. या कंपनीचे सभासद होते. या सोसायटीने त्यांचा दि. न्यु इंडिया इन्सूरन्स कंपनीचा 7 लाखाचा विमा काढला होता. सदरील मंजूर विम्याचा धनादेश बबन पांढरे यांच्या पत्नी सुजाता यांना त्यांच्या घरी जावून सुपूर्त करण्यात आला.
यावेळी विमा कंपनीचे व्यवस्थापक श्री. पठाण, श्री. कदम, संस्थेचे चेअरमन देवानंद सुरवसे, सचिव विष्णु इंगळे, संचालक अरुण दुधभाते आदींची उपस्थिती होती.