तुळजापूर, दि. ५ : तुळजापूर तालुका भूमी अभिलेख कार्यालयातील अधीक्षक पंडित तुकाराम डोईफोडे यांनी अचानक सोमवार दि. 4 डिसेंबर रोजी रात्री आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे तुळजापूर तालुक्यात एकच खळबळ माजली आहे. त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीमुळे पोलीस कोणती कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

तुळजापूर येथील भूमी अभिलेख कार्यालयामध्ये काम करणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांची नावे आत्महत्या करण्यापूर्वी भूमी अधीक्षक पंडित डोईफोडे यांनी लिहिली असल्याचे वृत्त पोलिसांनी दिले आहे. याप्रकरणी पोलीस तपासाची भूमिका महत्त्वाची ठरणार असून कोणाच्या त्रासामुळे त्यांनी हे कृत्य केले याची उलट सुलट शहरात चर्चा चालू आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, तुळजापूर येथे पदभार घेतल्यापासून भूमी अधीक्षक पंडित डोईफोडे सातत्याने तणावाखाली होते आणि प्रकरणांमध्ये लोकांच्या दाब धडा दडपशाहीला त्यांनी तोंड दिले कार्यालयाच्या अंतर्गत बाबी बाहेर येत असल्यामुळे ते त्रस्त होते. या त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचे समजते. याप्रकरणी तुळजापूर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून याप्रकरणी पोलीस कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, पत्नी असा परिवार आहे. तुळजापुरातील एसटी कॉलनी मध्ये ते भाड्याने राहत होते. राहत्या घरी त्यांनी आत्महत्या केली आहे.

भुमी अभिलेख कार्यालय, तुळजापूर येथील कर्मचारी श्री एस.एन. सुर्यवंशी, श्री एस.एस. ढोले, श्री ए.ए. माने यांनी खोट्या सह्यांची बनावट कागदपत्रे, फेरफार इत्यादी कार्यालयीन कागदपत्र बनवली होती. यावरुन कार्यालय प्रमुख उप अधीक्षक- श्री पंडीत डोईफोडे, वय 52 वर्षे यांनी नमूद तीघांविरुध्द पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवल्याने नमूद लोक पंडीत डोईफोडे यांना वेळोवेळी मानसिक त्रास देत होते. त्यांच्या या त्रासास कंटाळून पंडीत डोईफोडे यांनी दि. 04.01.2021 रोजी तुळजापूर येथील राहत्या घरी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या भाऊ- मारुती डोईफोडे यांनी आज दि. 05.01.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद तीघांविरुध्द भा.दं.सं. कलम- 306, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
Top