रेडा, दि. ५ :  इंदापूर तालुक्यातील जाधववाडी ग्रामपंचायत ग्रामस्थांनी एकत्र येऊन बिनविरोध केली. या ग्रामपंचायतीमध्ये सात जण ग्रामपंचायत सदस्य आहेत. ग्रामपंचायतीच्या सात जागांसाठी मुदत अखेरच्या दिवसापर्यंत सातच उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छानणी प्रक्रियेत सातही अर्ज वैध ठरले.त्यामुळे इंदापूर तालुक्यातील  जाधववाडी ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे.

जाधववाडी ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याबद्दल माजी मंत्री  हर्षवर्धन पाटील व इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे यांनी सर्व सदस्यांचा पाटील यांच्या इंदापूर येथील भाग्यश्री बंगलो हार्षवर्धन पाटील  याच्या  निवासस्थानी  सत्कार करुन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

जाधववाडी नूतन ग्रामपंचायत सदस्य  विलास तुळशीराम जाधव, विठ्ठल  वसंत जाधव,रूपाली प्रताप जाधव,चांगूणा उद्धव जाधव, नसिमा लिजाम मुलाणी,ज्योती दादासाहेब खरात, उमेश बलभिम खरात या नूतन सदस्यांच्या सहकार्याने आता जाधववाडी ग्रामपंचायतचा कारभार चालणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बनकर सह सहाय्यक निवडणूक  अधिकारी बाळासाहेब तांबीले यांनी काम केले.तसेच याचसोबत तालुक्यातील जाचक वस्ती ग्रामपंचायत ग्रामस्थांनी एकत्र येऊन बिनविरोध केली आहे.ग्रामपंचायतींसाठी उमेदवार माघारीचा आज शेवटचा दिवस होता. तत्पूर्वी गावातील सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र बसून ग्रामपंचायत बिनविरोध निवड केली आहे.

 
Top