नळदुर्ग, दि. 05 : येथे दि. 11 जानेवारी ते 26 जानेवारी या कालावधीत मरीआई स्टेडियमवर भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून विजेत्या संघासह अनेकाना रोख रक्कम व ट्रॉफी पारितोषिक देण्यात येणार आहे. इच्छुक संघानी नाव नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नळदुर्ग येथील नवरंग टेलर यांच्यावतीने या स्पर्धा आयोजित केली आहे. 32 संघांना प्राधान्य देण्यात येणार असून हा सामना 12 षटकांचा राहील. प्रवेश फीस दि. 7 जानेवारी पर्यंत नवरंग टेलर यांच्याकडे जमा करावी, यासह इतर नियम व अटी आहेत. स्पर्धेत प्रथम पारितोषिक 51 हजार 111 रुपये व ट्रॉफी, द्वितीय पारितोषिक 25 हजार 111 रुपये व ट्रॉफी, फायनल मॅन ऑफ द मॅच, फायनल मॅन ऑफ द सिरीज आदी पारितोषिक देण्यात येणार आहेत.