तामलवाडी : सर्जेराव गायकवाड

तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी ग्रामपंचायत निवडणूकीचा निकाल जाहीर झाला असुन या निवडणुकीत भाजपा प्रणीत एकता पॅनलचा धुव्वा उडवत महाविकास आघाडीने ग्रामपंचायतीवर आपला झेंडा फडकवला आहे.विद्यमान माजी सरपंच, उपसरपंच दत्तात्रय वडणे यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. 

     तुळजापूर तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या तामलवाडी ग्रामपंचायत निवडणूकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला असून तामलवाडी ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीने आपले वर्चस्व सिद्ध करत झेंडा फडकवला आहे.इतर निवडणुकी पेक्षा या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते कारण माजी सरपंच, उपसरपंच दत्तात्रय वडणे, बाजार समितीचे संचालक यशवंत लोंढे, माळी महासंघाचे प्रदेश सरचिटणीस मारुती रोकडे, माजी उपसरपंच हमीद पठाण,भ्रष्टाचार निर्मूलनचे जिल्हाध्यक्ष शिवाजी सावंत असे दिग्गज मैदानात उतरले होते.मागील काळात ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात झालेला भ्रष्टाचार व पुन्हा तेच उमेदवार यामुळे जनता त्रस्त झाल्याने जनता बदल घडवून आणणार असे चित्र दिसत होते त्याप्रमाणे जनतेने त्यांना मतदानातुनच बाजुला करून महाविकास आघाडीच्या हातात सत्ता दिली. अकरा सदस्य संख्या असलेल्या या ग्रामपंचायतीमध्ये भाजपा प्रणीत एकता ग्रामविकास पॅनलचे प्रभाग क्रमांक चार मधुन यशवंत लोंढे, शितल गायकवाड, प्रभाग क्रमांक तीन मधुन अनिता पाटील हे तीन उमेदवार विजयी झाले.तर महाविकास आघाडी प्रणीत सर्वधर्मसमभाव ग्रामविकास आघाडीचे प्रभाग क्रमांक एक - हमीद पठाण, नुरबानो बेगडे, सुरेखा माळी, प्रभाग क्रमांक दोन- अप्पासाहेब रणसुरे, सतीश माळी, मंगल गवळी, प्रभाग क्रमांक तीन - सुधीर पाटील व प्रभाग क्रमांक चार - संजना गुरव हे आठ उमेदवार विजयी झाले असून ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीने आपला झेंडा फडकवला आहे.

      ही निवडणूक जिंकण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने गुंडप्पा गायकवाड, मुकुंद गायकवाड,दत्तात्रय गवळी,अजीज पटेल,मारुती पाटील,विजय कोंडकर,रमेश म्हेत्रे,महेश जगताप, नानासाहेब पाटील, भारत पाटील, भिमा रणसुरे, अमोल गायकवाड, उमेश गायकवाड, रवि पाटील, निरंजन करंडे, मनोज पाटील, शाहीर गायकवाड, जगन्नाथ गायकवाड,सचिन शिंदे,महेश गायकवाड, राहुल वाघमारे, धम्मपाल रणसुरे, शिवाय रणसुरे,आदींनी परीश्रम घेतले.

 
Top