अणदूर, दि. १८ : अणदुर ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीने दणदणीत विजय मिळवला असून 17 पैकी 16 जागा जिंकून भाजप प्रणित जय मल्हार पॅनलचा धुव्वा उडवला आहे माजी मंत्री मधुकराव चव्हाण व शिक्षण महर्षी सि.ना.आलुरे गुरुजी यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा जनतेने विश्वास दाखवला आहे.

अत्यंत चुरशीने लढवले गेलेल्या अणदूर ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपप्रणीत जय मल्हार पॅनल व काँग्रेस प्रणित महा विकास आघाडी प्यानॉल यांच्यात चुरस होती संपूर्ण प्रचारात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या होत्या ,दोन्ही बाजूच्या प्रचार सभामुळे गावचे वातावरण ढवळून निघाले होते त्यामुळे या निवडणुकीत काय होणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते.

 आज झालेल्या मतमोजणीत काँग्रेस प्रणित महा विकास आघाडीने 17 पैकी 16 जागा जिंकून आपले निर्विवाद वर्चस्व स्थापित केले या निवडणुकीत भाजपप्रणीत जय मल्हार पॅनल ला एका जागेवर समाधान मानावे लागले विजयी उमेदवारांमध्ये महा विकास आघाडीचे धनराज मुळे, डॉक्टर नागनाथ कुंभार ,सौ सरिता मोकाशे, रामचंद्र आलुरे, देवकी चौधरी, स्नेहा मुळे बाळकृष्ण घोडके ,गोदावरी गुड्डू, डॉक्टर जितेंद्र कानडे ,उज्वला बंदपट्टे, बालाजी घुगे, जयश्री व्हटकर,मोटनबी इनामदार डॉक्टर विवेक बिराजदार अनुसया कांबळे, गणेश सूर्यवंशी हे सोळा उमेदवार विजयी झाले.

 तर जय मल्हार पॅनलच्या एकमेव महिला,उमेदवार अनिता घुगरे या अवघ्या सात मतांनी विजयी झाल्या अणदूरच्या इतिहासात प्रथमच सत्ताधारी काँग्रेसला एवढे मोठे घवघवीत यश प्राप्त झाले असून ही निवडणूक अनेक अर्थांनी गाजली. या निवडणुकीत शिवसेनेचे नेते बाळकृष्ण घोडके यांनी तीस वर्षाच्या आपल्या राजकीय कारकीर्दीत पहिल्यांदा निवडणूक लढवून विजय प्राप्त केला तर माजी सरपंच धनराज मुळे यांनी चौथ्या वेळेस निवडणूक लढवून सलग चौथा विजय संपादन केला आलुरे गुरुजी यांचे पुतणे रामचंद्र आलुरे यांनी या निवडणुकीत विजय मिळवीत सक्रिय राजकारणात प्रवेश केला डॉक्टर नागनाथ कुंभार ,माजी सरपंच सरिता मोकाशे यांनी दुसऱ्यांदा विजय प्राप्त केला तर डॉक्टर जितेंद्र कानडे यांनी तिसऱ्यांदा निवडणूक जिंकून विजयाची हॅटट्रिक केली तर ग्रामपंचायत मध्ये तीन डॉक्टरांनी विजय प्राप्त केला,तर विजई उमेदवारांनी, गुलाल उधळून कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

 
Top