तुळजापूर : सतीश महामुनी 

माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी महाराष्‍ट्राची कुलस्‍वामिनी श्री तुळजाभवानी चे मनोभावे दर्शन घेतले आणि पूजा केली.  

तुळजाभवानी देवीचे दर्शन घेण्यासाठी माजी केंद्रीय राज्यमंत्री  अहिर यांनी  शनिवारी सकाळी अकरा वाजता मंदिरात आले होते. तेव्हा तुळजाभवानी देवीचे पुजारी विकास मलबा यांनी त्यांची विधीवत पूजा केली आणि त्यांना आर्थिक करून आशीर्वाद दिला त्यानंतर प्रशासकीय कार्यालयात भारतीय जनता पार्टी जिल्हा चिटणीस गुलचंद व्यवहारे व तालुका सरचिटणीस विकास मलबा यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा तुळजापूर भाजपच्या वतीने सत्कार केला.

 
Top