अचलेर : जय गायकवाड

लोहारा तालुक्यातील अचलेर भीमनगर येथे आष्टा(का) केंद्रा अंतर्गत १ ते ४ वर्ग असलेली जिल्हा परिषद स्पेशल प्राथमिक शाळा आहे.ही शाळा द्वीशिक्षकी असून साधारण ४२ विद्यार्थी या शाळेत ज्ञानाचे धडे गिरवत आहेत.

कोरोना या रोगामुळे एक वर्ष होत आला सर्व शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शिक्षण मात्र नियोजित चालू आहे.

ही शाळा भीमनगर वस्तीत असल्यामुळे नेहमी लहान,मोठे, वयोवृध्द सर्वांचे या शाळेवर नेहमी  लक्ष आहे.

शिक्षणाच्या बाबतीत अतिशय नावाजलेली ही शाळा केंद्रात एक ओळख निर्माण केलेली शाळा आहे.या शाळेचे अनेक विद्यार्थी उच्च पदावर कार्यरत आहेत.

माजी मुख्याध्यापक राजशेखर स्वामी असताना सुद्धा या शाळेचा एक दबदबा होता तो आजही कायम आहे. विशेष बाब म्हणजे या शाळेचे शालेय पोषण आहार कर्मचारी श्री.सदानंद कांबळे व त्यांच्या पत्नी सौ.लक्ष्मीबाई कांबळे या नेहमीच शाळेकडे अगदी जबाबदारीने लक्ष देतात.

पण आज मात्र येथील तरुण युवक,लहान सहान सर्वांनी मिळून शाळेच्या भोवती पडलेला कचरा, दगड,गोटे सर्व उचलून शाळेची एकदम व्यवस्थित साफ-सफाई केली.

या कार्याचे मुख्याध्यापक श्री. गिरी, सहशिक्षक श्री.पानढवळे,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सर्व सदस्य व भीमनगर वासीयांच्या वतीने कौतुक होत आहे..

 
Top