मुंबई, दि. 08 : महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी काँग्रेस सोशल मीडिया विभागाची प्रदेश कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे .विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमीर शेख आणि राष्ट्रीय अध्यक्ष मनोज लोबाना यांच्या नेतृत्वाखाली ही कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे.
यामध्ये सोशल मीडिया प्रदेशाध्यक्ष पदी अभिजित हळदेकर व उपप्रदेशाध्यक्षपदी अवेस पटेल यांच्यी निवड करण्यात आली. तसेच पाच समन्वयक नियुक्त करण्यात आले. यात अनिकेत राहुल भंडारे, स्वप्निल दळवी, कौस्तुभ लोखंडे, सय्यद अवेज अख्तर, दहाता मिश्रा यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे महाराष्ट्र विदयार्थी काँग्रेस सोशल मीडिया बळकट होण्यास मदत होणार असून यामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यभरात खूप कौतुक होत आहे. तसेच विद्यार्थी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष नीरज कुंदन यांच्यासह सर्व प्रदेश कॉंग्रेसचे जेष्ठ नेते यांनी अभिनंदन केले आहे.