उस्मानाबाद,दि.13 : राज्य शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमातर्गत जिल्हयातील आरोग्य विभागाने कुटुंब कल्याण आणि माताबाल संगोपन कार्यक्रम यशस्वीपणे राबवावा,असे आदेश पुणे येथील आरोग्य व कुटुंब कल्याणचे सहायक संचालक डॉ.डी.टी.कानगुले यांनी नुकतेच येथे केले.
बेंबळी येथील प्राथमिक आरोग्य केंदात आढावा बैठकीत ते बोलत होते.यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषदेचे डॉ.एच.व्ही वडगावे,वैद्यकीय अधिकारी आरोग्य केंद्रा बेंबळीचे डॉ.अमोल सूर्यवंशी हे उपस्थित होते.
कुटुंब कल्याण कार्यक्रमाअंतर्गत देण्यात येणाऱ्या सेवेचा आढावा घेण्यासाठी बेबळी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात भेट देवून पाहणी केली. यात प्रसुती झालेल्या मातेशी संवाद साधला आणि त्यांना देण्यात येणाऱ्या सेवेबाबत माहिती जाणून घेतली. प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत औषधी,प्रसुतीगृह,कुटुंब कल्याण शस्त्रगृह,कार्यालयीन स्वच्छता आणि बाबत पाहणी केली.
या कार्यक्रमास औषध निर्माण अधिकारी अनिल वाघमारे,श्रीमती जनाबाई, श्री.कोळगे, श्रीमती जयश्री, राऊत,श्री.मधुकर कोल्हाळ आणि आरोग्य सहाय्यक व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.