तुळजापूर : डॉ. सतिश महामुनी

कोरोना संसर्गजन्य परिस्थितीमध्ये सर्व प्रसारमाध्यमांनी आपली जबाबदारी आणि कर्तव्य सांभाळून या काळात पत्रकारिता केली आहे, आकाशवाणी व दूरदर्शन या शासकीय माध्यमांना वस्तुनिष्ठ माहिती प्रसारित करण्याचे काम उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हा प्रतिनिधी देविदास पाठक यांनी अत्यंत जबाबदारीने पार पाडल्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचा आज सत्कार संपन्न झाला, वस्तुनिष्ठ पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांचा सत्कार भारतीय जनता पार्टीने केला आहे.

कोरोना काळात केलेल्या उत्कृष्ट वार्तांकनाला प्रसार भारती आकाशवाणीचा पुरस्कार मिळाल्याबद्दल उस्मानाबाद येथील आकाशवाणी वार्ताहर  देविदास पाठक यांचा राष्ट्रीय युवा दिन स्वामी विवेकानंद जयंती आणि राष्ट्रमाता जिजाऊ  साहेब यांच्या जयंतीदिनी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने जिल्हाध्यक्ष नितीन काळे, भाजयुमो प्रभारी अरुण पाठक, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड अनिल काळे,  भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंहा  राजेनिंबाळकर, गटनेते युवराज नळे,  जिल्हा उपाध्यक्ष इंद्रजित देवकते,  महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ माधुरीताई गरड तसेच अन्य पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

 
Top