नळदुर्ग , दि. १२: सोलापूर - हैद्राबाद महामार्गावर नळदुर्ग येथे एस. टी बसने पाठीमागुन अँटोरिक्षाला जोराची धडक देवुन झालेल्या आपघातात १ ठार झाल्याची घटना घडली आहे.
चालक- ज्ञानोबा परिहार, रा. औसा यांनी बस क्र. एम.एच. 25 बीएल 1237 ही दि. 11 जानेवारी रोजी 10 वाजता राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 वर नळदुर्ग शिवारात चालवून समोरील ऑटोरिक्षाला पाठीमागून धडक दिली. या अपघातात रिक्षा चालक- सिध्दाप्पा सुभाष क्षिरसागर, वय 29 वर्षे, रा. अणदूर, ता. तुळजापूर हे गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या त्यांचे वडील- सुभाष क्षिरसागर यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) आणि मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.