काटी : उमाजी गायकवाड

 तुळजापूर तालुक्यातील सावरगाव  येथील कु.मधू राजेंद्र राऊत या विद्यार्थिनीची आसियान (ASEAN) इंडिया हॅकेथॉन २०२१ स्पर्धेसाठी निवड झाली असून ती पुण्याच्या खडकवासला येथील डिफेन्स इन्स्टिटूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नोलॉजी या संस्थेत सायबर सिक्युरिटी विभागातून एम.टेक.चे शिक्षण घेत आहे.

देशभरातील १ हजार ३०० विद्यार्थ्यांमधून तीची निवड करण्यात आली आहे. शिक्षण मंत्रालयाच्या इनोव्हेशन सेलच्या वतीने आयोजित केलेल्या स्मॉर्ट इंडिया हॅकेथॉन २०२० मध्ये यश मिळविणाऱ्या डीआएटीच्या एज ऑफ अल्ट्रॉन या संघातील ती सदस्य होती. 

गेल्या वर्षी या स्पर्धेत विजेत्या संघातील सर्व विद्यार्थ्यांची ऑनलाइन तांत्रिक परीक्षा व मुलाखती घेण्यात आल्या होत्या. ही संपूर्ण प्रकिया यशस्वीपणे पूर्ण करत आसियान इंडिया हॅकेथॉनसाठी देशभरातून निवडलेल्या ५० विद्यार्थ्यांमधून तिची निवड करण्यात आली आहे. 

यासाठी डॉ.सुनिता ढवळे यांनी तिला मागदर्शन केले. शिक्षण, विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्राच्या सहकार्याने देशात आर्थिक विकासासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये दहा देशातील विद्यार्थी सहभाग घेणार असून ही स्पर्धेचा वेळ २६ मिनिटांचा असणार आहे. १ फेब्रुवारी ४ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत मधू भारताच्या संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. या संघात सिंगापूर, व्हिएतनाम, थायलंड  आणि फिलिपिन्समधील सदस्यांचा सहभाग असणार आहे. कु. मधू राऊत यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

 
Top