तामलवाडी : सर्जेराव गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील जळकोटवाडी येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा दि. १६ रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थित मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त जळकोटवाडी येथे छावा प्रतिष्ठान, शिवरत्न ग्रुप, शिवबा ग्रुप व ग्रामस्थांच्या वतीने राज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवर्य श्री महंत माऊजीनाथ महाराज यांच्या शुभहस्ते धर्मवीर संभाजी महाराज यांच्या मूर्तीस दुग्धाभिषेक करुन हा शंभूराजे राज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न झाला
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शंभुकवी वैभव साळुंके मराठा क्रांति ठोक मोर्चाचे राज्यसम्नवयक महेश डोंगरे , संभाजी ब्रिगेड सोलापूर, जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत , संभाजी ब्रिगेड धाराशिव जिल्हा कार्याध्यक्ष शरद पवार राष्ट्रवादी युवक काँग्रेसधाराशिव जिल्हाध्यक्ष आदित्य गोरे , राजकुमार भाऊ पाटील,भाजपा तालुकाध्यक्ष संतोष दादा बोबडे, विरवडे बु चे नवनाथ अवताडे , श्रीधर पाटील, त्रिंबक फंड, शिवसेना विभाग प्रमुख काटी गट तुळशीराम बोबडे, गणेश डोलारे ,राजेंद्र देशमुख तुषार साठे, मनोज धावणे, तसेच शंभुभक्तव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.