तुळजापूर दि १७ : डॉ. सतीश महामुनी
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्या उपस्थित तुळजापूर शहर आणि तालुक्यातील तरुणांनी जाहीर प्रवेश केला असून महा विकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही तरुणांनी प्रवेश केल्याचे यावेळी सांगण्यात आले.
शहर आणि तालुक्यातील तरूण आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर या तरुणांना मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सर्व जाती-धर्माला सोबत घेऊन राजकारणामध्ये अनेक वर्षापासून काम करत आली आहे. सत्ता असो किंवा नसो राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यामध्ये दमदार कामगिरी केली आहे. त्या बळावर अलीकडच्या काळात पक्षांमध्ये येणाऱ्या नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे प्रमाण वाढले आहे तुळजापूर तालुक्यात तरुणांनी पक्षात प्रवेश केला आहे. त्यांना पक्षांमध्ये सन्मानाची वागणूक दिली जाईल आपण सर्वजण मिळून उस्मानाबाद जिल्ह्याच्या विकासासाठी प्रत्येक गावात प्रत्येक वार्ड समोर ठेवून गोर गरीब माणसाच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील व शहराध्यक्ष अमर चोपदार यांनी प्रवेश केलेल्या सर्व तरुणांना शुभेच्छा दिल्या.
येथील भावसार मंगल कार्यालय येथे अल्पसंख्यांक समाजातील तरुणांचा प्रवेश घेण्याचा कार्यक्रम संपन्न झाला याप्रसंगी जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, तालुका अध्यक्ष धैर्यशील पाटील, विधानसभा अध्यक्ष गोकुळ शिंदे, युवक तालुकाध्यक्ष संदीप गंगणे, ततालुका कार्याध्यक्ष शरद जगदाळे, माजी नगरसेवक धनंजय पाटील, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष रफिक शेख, शहराध्यक्ष अमर चोपदार, युवक शहराध्यक्ष नितीन रोचकरी, व्यापार आघाडी तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार, नितीन बागल, मकसूद शेख मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रामीण भागातील तरुणांनी प्रवेश केला.
तुळजापूर येथील पाषाभाई सय्यद, शकील सय्यद, फहड सय्यद, शहाजहा शेख, रफिक शेख, इक्बाल शेख, रियाज शेख, सोहेल शेख, माज्जू तांबोळी,इलियास आतर, अमन पाटवेकर, अरबाज फुटानकर, सद्दाम तांबोळी, रमजान तांबोळी , तय्यान तांबोळी, सलमान तांबोळी, अमीर आतर, सलमान तांबोळी, वाजेद तांबोळी, अस्लम तांबोळी, फेरोज शेख, तन्वीर तांबोळी, वाजेद नदाफ, शादान शेख, यांच्यासह ग्रामीण क्षेत्रातून खंडाळा येथील यशवंत पवार, युनुस शेख , राजेंद्र पवार, दत्तात्रय पवार, हरिदास पवार, गुलाब सय्यद, संदिपान शिंदे, कालिदास चौरे आदी तरुणांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या विचारावर विश्वास ठेवून प्रवेश केल्याचे सांगण्यात आले.
अलीकडच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तुळजापूर शहर आणि तालुक्यामध्ये पक्षाची ताकद वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले असून त्यांना पक्ष वाडी मध्ये चांगले यश मिळत आहे. विधानसभा अध्यक्ष गोकुळ शिंदे यांनी यावेळी प्रास्ताविक केले. पक्षामध्ये प्रवेश केलेल्या सोबत तरुणांचे तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील व अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष रफिक शेख यांनी आभार मानले आहेत.