तुळजापूर दि १७ : सतीश महामुनी

शिवसेनेचे उपनेते व राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर तुळजापूर नगरपरिषदेच्या वतीने प्रमुख मागण्यांचे निवेदन मंत्री महोदयांना देण्यात आले.

तुळजापूर शहराची हद्दवाढ झालेल्या भागांना भूमिगत गटारे आणि रस्ते तसेच इतर मूलभूत सुविधा देण्यासाठी निधीची तरतूद करण्यात यावी याकामासाठी ९२ लाख रुपयांची तरतूद करण्यात यावी , छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या या प्रस्तावास तातडीने मंजुरी देण्यात यावी, शिवरायांच्या पुतळ्याचा प्रश्न तातडीने मंजुरी देऊन सोडविण्यात यावा तसेच  छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक  सुशोभीकरण यासाठी ७७ लक्ष तरतुदीला मान्यता देण्यात यावी, अभियंता पदाची रिक्त पदे करण्यात यावी २०१९  व २०२० दोन वर्षाचे यात्रा अनुदान अद्याप प्राप्त झाले नाही हे अनुदान देण्यात यावी या मागण्यांचे निवेदन नगराध्यक्ष सचिन रोचकरी , मुख्याधिकारी डॉ. आशिष लोकरे, माजी नगरसेवक विशाल रोजकरी, अभियंता चव्हाण, अभियंता काटकर, तुळजाभवानी मंदिर जनसंपर्क अधिकारी नागेश शितोळे यांच्या उपस्थितीत देण्‍यात आले.

 
Top