तुळजापूर दि १७ : डॉ. सतीश महामुनी

सशुल्क प्रवेश पास विक्रीसाठी सराया धर्मशाळा येथे मंदिर संस्थांकडून  नवीन काउंटर सुरू करण्यात आले आहे. कमान वेस परिसरातील पुजारी आणि भाविक भक्तांना या केंद्राचा उपयोग होणार आहे येथे केंद्र करण्याची मागणी या परिसरातील पुजारी बांधवांनी केली होती.

कमानवेस भागा मधील पुजारी बांधवांच्या पेड पास काऊंटर मागणी नुसार तुळजा भवानी मंदीर संस्थानच्यावतीने पेड पास काऊंटरचे उदघाटन नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्या हस्ते संपन्न झाले. 

याप्रसंगी नगरसेवक राहुल खपले,नानासाहेब लोंढे,संजय लोंढे,शाम क्षिरसागर,गणेश कदम,गोविंद लोंढे,आबासाहेब खपले,नानासाहेब डोंगरे,आनंद क्षीरसागर,चंद्रकांत पाटील व समस्त पुजारी बांधव उपस्थित होते.

कमान वेस परिसर येथे मोठ्या संख्येने भाविकांची संख्या असल्यामुळे पुजारी बांधवांच्या मागणीनुसार आपण तुळजाभवानी मंदिर संस्थांकडे पाठपुरावा करून सदर सशुल्क वितरित करण्याचे केंद्र सुरू केले आहे अशी माहिती नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी यानिमित्ताने दिली आहे.

 
Top