तुळजापूर : सतीश महामुनी
तुळजापूर तालुक्यातील लसीकरणा प्रारंभ झाला असून पहिले लसीकरण डॉक्टर दिना उपासे यांना करण्यात आले, कोरोना संकटकाळात डॉक्टर उपासे यांनी बहुमोल योगदान दिले आहे त्यांच्या त्या कर्तुत्वाचा याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी गौरव केला.
दि १६ जानेवारी रोजी तुळजापूर शहरातील ग्रामीण रुग्णालय येथे कोरोना लसीकरण सुरवात करण्यात आली. या लसीचा पहिला डोस डॉ. दिनार उपासे यांना देण्यात आला. तत्पूर्वी या प्रसंगी तुळजाभवानी देवीच्या प्रतिमेचे पूजन नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉ चंचल बोडके, समाजसेवक आनंद कंदले, डॉ. प्रवीण रोचकरी, डॉ दिग्विजय कुतवळ, श्रीधर जाधव, डॉ चंद्रकांत क्षीरसागर, डॉ श्रीमती गडीकर , डॉ सुहास पवार, स्टाफ प्रमुख श्रीमती भोसले व सर्व कर्मचारी उपस्थित होते.
यानिमित्ताने नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी पूर्ण संकटकाळात तुळजापूर तालुक्यामध्ये संसर्गाचा त्रास होणाऱ्या रुग्णांना अत्यंत चांगल्या पद्धतीने उपचार करण्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय डॉक्टर आणि कर्मचारी यांनी चांगली भूमिका बजावल्याचे सांगितले. डॉक्टर चंचला बोडके आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी या काळात परिश्रम घेऊन रुग्णांची सेवा केली आहे, त्यामुळे आम्ही सर्व आरोग्य कर्मचारी आणि अधिकारी यांचे अभिनंदन करीत असल्याचे सांगितले. आज पासून कोरोना लसीकरण उपक्रमाची केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली झालेली सुरुवात सर्वसामान्य माणसाला कोरोनापासून कायमस्वरूपी मुक्त करणारे ठरणार आहे अशा शब्दात युवक नेते आनंद कंदले यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.