चिवरी , दि. १९ : तुळजापूर तालुक्यातील ५३ ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी दि. १५ रोजी झालेल्या निवडणुकीत मौजे धनगरवाडी ग्रामपंचायतीचा समावेश होता, या निवडणुकीत ग्रामविकास परिवर्तन पॅनेलने दणदणीत विजय मिळवला आहे, 

या निवडणुकीत ग्रामविकास परिवर्तन पॅनलचे वार्ड क्रमांक एक मधून सौ.सुरेखा खंडू घोडके, नागनाथ नामदेव घोडके, श्रीमती जयश्री केशव एडके,तर वार्ड क्रमांक दोन मधुन सौ. सुवर्णा महादेव घोडके, राम श्रीकांत कदम हे विजयी झाले.

 या विजयाबद्दल धनगरवाडी  गट ग्रामपंचायत चव्हाण वाडी येथे उमेदवारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्राम विकास परिवर्तन पॅनेल च्या सर्व कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थांनी गुलालाची मुक्त उधळण करूण आनंदोत्सव केला.
 
Top