तुळजापूर, दि. २३:
बहुजन वंचित आघाडीच्या उमेदवारांनी आपल्या मतदारांच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात असे उद्गार बहुजन वंचित आघाडीचे नेते मिलिंद रोकडे यांनी काढले .
तुळजापूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये बहुजन वंचित आघाडीचे वतीने निवडून आलेल्या नुतन ग्रामपंचायत सदस्य सत्कार बहुजन वंचित आघाडीचे नेते मिलिंद रोकडे यांच्या हस्ते करण्यात आला.
यामध्ये जळकोट ग्रामपंचायत निवडणूक मध्ये वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अंकुश लोखंडे व सिंदफळ ग्रामपंचायत मध्ये निवडून आलेले वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते धम्मशील सिद्धगणेश, सराटी ग्रामपंचायतीमध्ये निवडून आलेले नागनाथ सुरवसे, गोविंद राठोड यांचा सत्कार वंचित बहुजन आघाडी तुळजापूर येथे मध्यवर्ती कार्यालयात सत्कार करण्यात आला.
यावेळी मिलिंद रोकडे , जीवन कदम, सुरेश चौधरी, शंभु ढाले उपस्थितीत होते.