तामलवाडी : सर्जेराव गायकवाड

तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी गावच्या सरपंच पदाचे आरक्षण दि.२२ रोजी जाहीर झाले असून सरपंच पदाचे आरक्षण सर्वसाधारण महिलांसाठी जाहीर करण्यात आले असल्याने ग्रामपंचायतीवर महीलाराज अवतारणार हे निश्चित झाले आहे. 

       तुळजापूर तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या तामलवाडी ग्रामपंचायतीवर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, वंचित, प्रहार यांनी महाविकास आघाडी करून दणदणीत विजय मिळवून ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवला.११ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीने ८ जागा जिंकून आपले वर्चस्व प्रस्थापित केले.तर भाजपा प्रणीत एकता पॅनलला तीन  जागेवर समाधान मानावे लागले.या निवडणुकीनंतर लक्ष लागले होते ते सरपंच पदाच्या आरक्षणाकडे ते दि. २२ रोजी जाहीर झाले असून ते सर्वसाधारण महिलांसाठी जाहीर झाले आहे.

१९९५ नंतर पहील्यांदाच सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण जाहीर झाले आहे.महाविकास आघाडीकडे प्रभाग दोन मधुन मंगल गवळी व प्रभाग एक मधुन नुरबानो बेगडे या दोन सर्वसाधारण महिला निवडुन आल्याने सरपंच कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असले तरी उपसरपंच पद हे परंपरेप्रमाणे मुस्लिम समाजासाठी देणार असल्याचे या अगोदरच महाविकास आघाडीने जाहीर केले असल्याने सरपंच पदासाठी मंगल गवळी तसेच उपसरपंच पदासाठी हमीद पठाण हेच प्रमुख दावेदार असल्याची चर्चा महाविकास आघाडीच्या गोटात होताना दिसत आहे.सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले असले तरी सरपंच, उपसरपंच निवडीसाठी मात्र थोडे दिवस प्रतिक्षा करावी लागणार आहे.

 
Top