ताज्या घडामोडी

  
नळदुर्ग,दि.23:
तुळजापूर तालुक्यात नुकत्याच निवडणुक झालेल्या ग्रामपंचायतसह एकुण 108 ग्रामपंचायत सरपंच पदाचे प्रवर्गनिहाय आरक्षण  1) अनुसूचित जाती ( SC ) एकुण - 18 त्यापैकी महिलांसाठी - 9 , 2) अनुसूचित जमाती ( ST ) एकुण - 01, 3) नागरिकांचा मागास प्रवर्ग ( OBC ) एकुण - 29 त्यापैकी महिलांसाठी - 15, 4) सर्वसाधारण ( OPN ) एकुण - 60  त्यापैकी महिलांसाठी - 30. याप्रमाणे आरक्षण जाहिर करण्यात  आले. या आरक्षणानुसार 54 ग्रा.प.मध्ये  महिलाचे महिलाराज येणार आहे. 


 जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली तुळजापूर तालुक्यातील 108 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण दि. 22 जानेवारी  रोजी  काढण्यात आले. 
गावनिहाय आरक्षण पुढिलप्रमाणे - 1) अनुसूचित जाती ( SC ) महिलांसाठी राखीव असलेल्या ग्रामपंचायती एकूण - 09  1) दहिटणा 2) बाभळगाव - केरूर 3) वडगाव ( देव ) 4) वडगाव लाख 5) हिप्परगा (ताड) 6) तिर्थ (बु ) 7) चिकुंद्रा 8) कात्री 9) काळेगाव.  अनुसूचित जाती ( SC ) पुरुषांसाठी राखीव असलेल्या  एकुण - 09 ग्रामपंचायती -  1)  मोर्डा - तडवळा 2) भातंब्री 3) कसई 4) गुजनूर 5) देवसिंगा (तुळ) 6) आपसिंगा 7) हंगरगा (तुळ) 8) इटकळ 9) ढेकरी.

 अनुसूचित जमाती ( ST ) एकुण - 01 1) नंदगाव. नागरिकांचा मागास प्रवर्ग ( OBC ) एकुण - 29  त्यापैकी महिलांसाठी राखीव असलेल्या 15 ग्रामपंचायती - 1) दिपकनगर 2) माळुंब्रा 3) फुलवाडी 4) पिंपळा (खु.) 5) बोरनदवाडी (नळ) 6) धोत्री 7) बारूळ 8) गंधोरा 9) कुंभारी 10) कदमवाडी ( कोरेवाडी/ यमगरवाडी) 11) गंजेवाडी 12) आरबळी 13) पांगरधरवाडी 14) पिंपळा (बु.) 15) मुर्टा - मानमोडी.  

नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) पुरुषांसाठी राखीव असलेल्या 14 ग्रामपंचायती - 1) काटगाव - घट्टेवाडी 2) केमवाडी 3) होर्टी 4) केशेगाव 5) निलेगाव 6) बोळेगाव 7) मसला(खु.) 8) मानेवाडी 9) हगलूर 10) शहापूर 11) बसवंतवाडी 12) तीर्थ (खु.) 13) हंगरगा(नळ) - इंदिरानगर 14) सलगरा(दिवटी). 

सर्वसाधारण    असलेल्या ग्रामपंचायती एकूण - 60 त्यापैकी महिलांसाठी असलेल्या 30 ग्रामपंचायती -  1) वडगाव - काटी 2) धनेगाव 3) सावरगाव 4) सलगरा (ततार) (मड्डी) 5) जळकोटवाडी - गवळेवाडी 6) येवती 7) खानापूर 8) खडकी - शिवाजीनगर 9) काटी 10) तामलवाडी 11) चिवरी 12) किलज 13) सारोळा 14) खुदावाडी 15) मंगरूळ 16) सराटी 17) शिरगापूर 18) बोरगाव 19) खंडाळा 20) व्होनाळा 21) वागदरी 22) आरळी (खु.) 23) दहिवडी 24) कामठा 25) चिंचोली 26) वाणेवाडी 27) येडोळा 28) रायखेल 29) रामतीर्थ 30) दिंडेगाव.  

सर्वसाधारण पुरुषांसाठी असलेल्या 30 ग्रामपंचायती - 1) गुळहळ्ळी 2) सांगवी - काटी 3) सांगवी - मार्डी 4) गोंधळवाडी 5) शिराढोण 6) जवळगा मेसाई 7) वाणेगाव 8) अणदूर 9) जळकोट 10) काक्रंबा 11) बिजनवाडी 12) धनगरवाडी 13) सुरतगाव 14) आलियाबाद 15) सिंदफळ 16) जळकोटवाडी (नळ) 17) अमृतवाडी 18) बोरी 19) कारला 20) उमरगा (चिवरी) 21) वडाचा तांडा 22) देवसिंगा (नळ) 23) सरडेवाडी 24) नांदुरी 25) लोहगाव 26) आरळी (बु.) 27) कुन्सावळी 28) सिंदगाव 29) देवकुरळी 30) चव्हाणवाडी. याप्रमाणे सरपंचपदाचे आरक्षण निघाले आहे. येत्या एक दोन दिवसात गावनिहाय सरपंचपदाच्या निवडीचा कार्यक्रम जाहिर होण्याची शक्यता आहे.
 
Top