उस्मानाबाद, दि. 22  : 

येथील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे येत्या 24 जानेवारी रोजी बालिका दिन तर 25 जानेवारी रोजी मतदान दिन साजरा केला जातो.त्या निमित्ताने विधी सेवा प्राधिकरणाने आज कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन केले होतेहा कार्यक्रम समर्थ नगरमधील इंधिरा गांधी नर्सिंग महाविद्यालयात घेण्यात आला.


          शिबिरासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एस.बी.तोडकर, ॲड.श्रीमती वैशाली धावणे, ॲड.श्रीमती डी.एस.जहागीरदार, ॲड. एम.बी.माढेकर तसेच 85 विद्यार्थी , विद्यार्थिनी, महाविद्यालय व विधी सेवा प्राधिकरणचे कर्मचारी असे  उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस.बी.तोडकर हे होते.


 या शिबिरात ॲड.श्रीमती वैशाली धावणे यांनी कायद्यातील महिलांविषयक विविध तरतूदी, शासकीय योजना याची सविस्तर माहिती दिली. संस्काराचे महत्व सांगितले. स्वरक्षण याबाबत मार्गदर्शन केले.


ॲड.श्रीमती डी.एस.जहागीरदार यांनी राज्यघटनेची उद्देशीका,मुलभूत अधिकार व कर्तव्य याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.त्यानंतर श्री.तोडकर यांनी हक्कांबरोबर कर्तव्यांची जाणीव ठेवणे आवश्यक आहे, मुलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्वे, कर्तव्य याबाबत सविस्ताराने माहिती सांगितली.


 बालिका दिनाचे महत्व, मतदाता दिनाचे महत्व याबाबत सविस्ताराने मार्गदर्शन केले. तसेच हुंडा देवू, नका घेवू नका, मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन मतदान करा, बालविवाहास प्रतिबंध करा असे आवाहन केले. ॲड.एम.बी.माढेकर यांनी प्रस्ताविक व सूत्रसंचालन केले तर छत्रपाल वाघमारे यांनी आभार मानले.

 
Top