नळदुर्ग, दि. 22
32 व्या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत
नळदुर्ग येथील महामार्ग पोलिस केंद्राच्यावतीने आणि अप्पर पोलिस महासंचालक (वाहतुक) डॉ. भूषण कुमार उपाध्यय पोलिस अधिकारी महामार्ग पोलिस विभाग पुणे संजय जाधव, उपाध्यक्ष प्रितम यावलकर, यांच्या मार्गदर्शनाखाली महामार्ग सुरक्षा प्रबोधन चित्ररथ तयार करण्यात आले असून महामार्ग लगतच्या गावात जाऊन वाहनचालकासह नागरिकांचे प्रबोधन करण्यात येत आहे.
दुचाकी वाहनचालकांनी हेल्मेटचा वापर करावे, मध्यपान करु नये, ओव्हर स्पीड, धोकादायक वाहन चालवू नये, अवैध प्रवासी वाहतुक करु नये. डिव्हायडर तोडू नये यासह वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत प्रबोधन करण्यात येत आहे. हा उपक्रम दि. 12 जानेवारी ते 17 फेब्रुवारी दरम्यान नळदुर्ग महामार्ग पोलिस केंद्राच्या हद्दीत राबविण्यात येत आहे.
या रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक जगदीश राऊत, रचना कंन्सट्रक्शनचे अमोल नरवडे, महामार्गपोलिस केंद्राचे प्रभारी अधिकारी एच.डी. कवले, पोलिस उपनिरीक्षक प्रभाकर पात्रे, सदानंद वाघमारे, पत्रकार पांडुरंग पोळे, यासह पोलिस कर्मचारी उपस्थित होते.