अणदूर ,दि.२३:
तालुक्यातील तुळजापूर अणदूर ग्रामपंचायत निवडणुकीत औषध क्षेत्रातील निवडून आलेल्या मान्यवरांचा सत्कार( ८)आठ फार्मा ग्रुपच्या वतीने करण्यातआला.
अणदूर ता.तुळजापूर येथिल ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेले डॉ.जितेंद्र कानडे, डॉ नागनाथ कुंभार, औषधी दुकानदार गुणवंत मुळे यांच्या पत्नी स्नेहा मुळे, दाळिंब येथील औषधी दुकानदार व नवनिर्वाचित सदस्य हिराजी गायकवाड यांचा यावेळी यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी ८ फार्मा ग्रुपचे संजय जाधव, महेश कार्ले, जीवन मोजगे ,गोविंद शिंदे, रवींद्र कानडे, पंकज नरवडे, अजय अंदूरकर, बाबुराव मुळे, वैजू कुंभार आदीजण उपस्थित होते,