नळदुर्ग , दि.23: 
रस्ता सुरक्षा अभियानांतर्गंत येथिल महामार्ग  पोलिस केंद्राच्यावतीने आयोजित प्रबोधनात्मक उपक्रमास नागरिकातुन उत्सर्फुत प्रतिसाद मिळत आहे.    

महामार्ग  पोलिस केंद्राच्या हद्दीत राज्य महामार्ग क्र. २०६ लगत असलेल्या मानेवाडी,बसवंतवाडी, तीर्थ बु , मंगरूळ ता. तुळजापूर या गावात पोलिसानी  जावुन  वाहन चालक व ग्रामस्थाशी संवाद साधुन वाहतुकीच्या नियमाबाबत जाणिव जागृती केली. दरम्यान आतापर्यंत 20 पेक्षा आधिक गावात चित्ररथा‌व्दवारे माहिती देण्यात आल्याचे प्रभारी आधिकारी एच.डी.कवले यांनी सांगितले.

 महामार्ग सुरक्षा प्रबोधन चित्र रथ व ऑडियो क्लिप द्वारे पोलीस अंमलदार बी. एन. साळुंखे यांनी वाहतूक नियम पाळणे विषयी प्रबोधन करून पत्रके वाटप केले. सदर गावातील नागरिकांनी वाहतूकीचे नियम पाळणे, विशेषतः हेल्मेट परिधान करूनच मोटार सायकल चालवु  याबाबत आश्वासन दिले व महामार्ग सुरक्षा प्रबोधन चित्र रथ हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत असल्याबद्दल  पोलिसांचे अभिनंदन केले.
 
दरम्यान ग्रामस्थांना वाहतूक नियमांबाबत सविस्तर मार्गदर्शन करून खालील प्रमाणे सूचना देण्यात आल्या.
चित्र रथाची माहिती  नागरिकांना देऊन जनजागृती करून वाहतुकीचे सविस्तर नियम सांगण्यात आले.  दुचाकी चालवत असताना नेहमी हेल्मेटचा वापर करावा, दारू अथवा कोणत्याही अंमली पदार्थाचे सेवन करून वाहन चालवू नये,  वाहन चालविताना वाहनाचा वेग कमी असावा, वाहन चालविताना मोबाईल फोनचा वापर करू नये, दुचाकीवर दोन पेक्षा अधिक इसम बसवून वाहन चालवू नये, वाहन चालविताना नेहमी सीट बेल्टचा वापर करावा, अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यासाठी देऊ नये, महामार्गावर आपले वाहन विरुद्ध दिशेने चालवू नका, महामार्गाचे सध्या काम चालू असून रोडचा अंदाज घेऊन आपले वाहन चालवावे इत्यादी सुचना देऊन वाहतूक नियमाविषयी पत्रके वाटप करण्यात आले.
 
Top