अचलेर : जय गायकवाड
उमरगा तालुक्यातील आलूर येथे शिवसेना शाखेच्या वतीने पक्षप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
या जयंती दिनाचे औचित्य साधून ग्रामीण रुग्णालय आलूर येथे वरनाळ व आलूर शिवसेना तसेच युवासेना यांच्या वतीने फळे व खाऊ वाटप करण्यात आले.
यावेळी तंटामुक्त समिती अध्यक्ष नागेश पाटील,सरपंच सुरेश बोळदे,उपसरपंच जितेंद्र पोतदार, शिवसेना युवा नेते सागर उमशेट्टे,श्रावण इंगळे,महादेव समन,योगेश धोत्रे, शरण ब्याळीकुळे,छगन लोहार, काशिनाथ मरबे,प्रशांत गुरव, सचिन बिराजदार,मालू कणमुसे, आदी शिवसैनिक तसेच ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.