चिवरी : राजगुरू साखरे

तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील ग्रामपंचायत कार्यालयात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व थोर स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली. 

यावेळी प्रतिमेस सरपंच अशोक घोडके व तानाजी जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी तंटामुक्त अध्यक्ष बलभीम मनशेट्टी, माजी उपसरपंच सुभाष जाधव, सीएससी चालक शंकर झिंगरे, नवनाथ शिंदे, विष्णु परिट,अनिल देडे, धनाजी कोरे, नारायण झांबरे, कल्याण स्वामी, आदी  उपस्थित होते.

 
Top