नळदुर्ग ,दि.१९:  एस.के.गायकवाड
शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची व दैनंदिन व्यवहारासाठी नळदुर्गला ये जा करणाऱ्या ग्रामस्थांची गैरसोय टाळण्यासाठी तुळजापूर तालुक्यातील वागदरी, दहीटणा मार्गे नळदुर्ग ते गुळहळ्ळी एसटी बससेवा पुर्ववत चालू करवी अशी मागणी करण्यात येत आहे.

    शालेय विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी नळदुर्ग बिटच्या शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती एस.एम.राउत, व शहापूर केंद्र प्रमुख बळवंत सुरवसे हे जि.प.प्राथमिक शाळा वागदरी येथे आले असता सरपंच ज्ञानेश्वर बिराजदार, उपसरपंच दत्ता सुरवसे,ग्रा.प.सदस्य रावसाहेब वाघमारे, पालक दत्ता पाटील , सुर्यकांत वाघमारे यांनी त्यांची भेट घेऊन सकाळी ८.३० वा.व सायंकाळी ४.३० वा.दरम्यान नळदुर्ग ते गुळहळ्ळी बस सेवा सुरू करण्यासाठी योग्य तो पाठपुरावा करण्याचे निवेदन दिले.

  यावेळी ग्रामसेवक जी.आर.जमादार, मुख्याध्यापिका महादेवी जत्ते, सहशिक्षक किसन जावळे,उपस्थित होते.
 
Top